ताज्या बातम्यादेश-विदेशनागपूरमहत्वाचेमहाराष्ट्र

स्त्री आणि कुंकू


स्त्रीने कुंकू लावावे की नाही
हा वैयक्तिक प्रश्न असे आमचा
भारतमाता सधवा असे म्हणून
अपमान करू नका स्त्री जातीचा

बालपणापासून लाविली टिकली
नका करू ही दास्यत्वाची निशाणी
नका दाखवू पुरुषत्त्वाचा ढोंगीपणा
सुधारा सत्तांध माजलेली ही वाणी

स्त्री सधवा असली अथवा विधवा
तरी पुरुषी अहंकाराने उपभोगली
असा कसा तुमचा संधीसाधूपणा
का आणावी राजकारणात टिकली?

अहिल्या सावित्री जिजाऊ लक्ष्मीबाई
भारत मातेच्या कर्तृत्ववान वारसदार
ह्या शूर सम्राज्ञिनींनी उभारला झेंडा
दूरवर देशाच्या, समुद्राच्या अटकेपार

कधी पूजतो देवी म्हणून कधी माता
नका घेऊ ठेका संस्कृती दास्यत्वाचा
मी सदा आदिम आणि अनंत रहाणार
प्रश्न असे स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा.

कवियत्री
सौ.प्रणोती कळमकर गुरुदेव नगर नागपूर

( साभार प्रबोधिनी न्युज)

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button