अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी
पिंपरी – मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तापकिरनगर, देहूफाटा येथे घडला.
सतीश मोतीराम राठोड (वय 23, रा. डुडुळगाव) आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 42 वर्षीय आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलीचा आणि आरोपीचा न्यूड फोटो पाठवला. तसेच मुलीचा अश्लील व्हिडीओ देखील पाठवला. तो व्हिडीओ आरोपी अन्य लोकांनाही पाठवून मुलीची बदनामी आणि विनयभंग केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !