पुणे विभागात 2400 चालक-वाहकांची पदे रिक्त!,उमेदवारांचे काय होणार?
पुणे: एसटी महामंडळातर्फे २०१९ मध्ये राज्यभरात ४४१६ जागांसाठी भरती निघाली होती. यानंतर उमेदवारांची नियमाप्रमाणे लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय तपासणीदेखील झाली. मात्र, त्यानंतर आलेला कोरोना आणि सत्तांतर यामुळे २४०० पात्र चालक-वाहक अद्याप वेटिंगवर आहेत.
तीन वर्षानंतरदेखील पुढे काहीच होत नसल्याने पात्र उमेदवारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यातच नव्याने कंत्राटी पद्धतीवर ५ हजार एसटी कर्मचायांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा यावर्षी केली आहे. २०१९ च्या उमेदवारांचाच अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना, पुढील उमेदवारांचे काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
यासंबंधीचे निर्णय स्थानिक पातळीवर होत नाहीत. मध्यवर्ती कार्यालयातून जोवर आदेश येत नाही, तोपर्यंत यावर आम्ही भाष्य करु शकत नाही. त्यांच्या आदेशानंतरच पुढील प्रक्रिया होईल.
– रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग, पुणे
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !