कॅफेला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू..
रशियन शहरातील कोस्ट्रोमा येथे एका कॅफेला लागलेल्या आगीत शनिवारी १५ जणांचा मृत्यू झाला आणि ५ जण जखमी झाले, अशी माहिती वृत्तसंस्थेने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भांडणाच्या वेळी कोणीतरी उघडपणे फ्लेअर गन वापरल्यानंतर पहाटेच्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच मदत बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि २५० जणांची सुटका केली. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
या कॅफेत जवळपास शेकडो लोक होते. तथापि, आग लागल्यानंतर २५० लोकांना बाहेर काढण्यात बचाव पथक यशस्वी झाले. कोस्ट्रोमाचे गव्हर्नर सर्गेई सिटनिकोव्ह यांनी सांगितले की, पाच जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय मदत मिळाली आहे.
आगीच्या या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून फ्लेअर गन वापरणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. कोस्ट्रोमा हे रशियातील जवळपास २ लाख ७० हजार लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर नदीकाठी वसलेले आहे. कोस्ट्रोमा हे मॉस्कोच्या उत्तरेस अंदाजे ३४० किलोमीटर (२१० मैल) अंतरावर आहे.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !