आयुक्त तुकाराम मुंढे साहेब; मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरताय; मुलभुत सुविधा कोण पुरवणार??? आयुक्तांना निवेदन -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
आयुक्त तुकाराम मुंढे साहेब; मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरताय; मुलभुत सुविधा कोण पुरवणार??? आयुक्तांना निवेदन -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_____
राज्य आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिवाळीच्या काळात बीड आरोग्य विभागाची बैठक घेऊन सर्व आधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक केले त्या अनुषंगानेच बीड जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ.अमोल गिते यांनी “मिशन सतर्क मोहीम “राबवुन रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन गैरहजर आधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल आयुक्तांना पाठवणार असल्याचे जाहीर केले.
डाॅ.अमोल गिते साहेब मिशन सतर्क मोहीम अंतर्गत मुख्यालयी असुविधाबाबतीतचा सुद्धा अहवाल आयुक्तांना पाठवा
____
राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून “मिशन सतर्क मोहीम “राबवणा-या डाॅ.अमोल गिते यांनी गैरहजर आधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अहवाला सोबतच आयुक्तांना
पिण्याचे शुद्ध पाणी,शौचालय,विद्युत पुरवठा,निवासस्थानाची पडझड आवश्यक दुरूस्ती ,महिलांची असुरक्षितेता आदि मुलभुत असुविधाच्या संदर्भात सुद्धा अहवाल पाठविण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र वस्तुस्थिती
___
लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिला वैद्यकीय आधिकारी म्हणून कार्यरत आहेत. निवासस्थान पाहिले तर पावसाळ्यात गळते,पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही,विद्युत पुरवठा आणि त्याठीकाणची लाईटफिटींग पाहण्याजोगी आहे. शौचालय काही दिवसापुर्वी शासनाशी अक्षरक्षः भांडुन दुरूस्तीसाठी निधी आणून व्यवस्था केलेली आहे. निवासस्थानाच्या पाठीमागील बाजुस दरवाजा तुटलेलाच आहे. याठिकाणी रात्री मुक्कामी राहणा-या वैद्यकीय आधिकारी-कर्मचारी महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार??हा खरा प्रश्न आहे..
मिशन सत्र मोहीम राबवणारे डाॅ.अमोल गिते मुलभुत असुविधाबाबत म्हणतात आयुक्तांना बोला :- डाॅ.गणेश ढवळे
___
मिशन सतर्क मोहीम राबवणारे जिल्हा आरोग्य आधिकारी बीड डाॅ.अमोल गिते यांना मुख्यालयी असणा-या मुलभुत असुविधाबाबत विचारले असता म्हणतात आयुक्तांनाच विचारा यासंदर्भात राज्य आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांना उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर,जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड,जिल्हा आरोग्य आधिकारी बीड,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत ईमेल द्वारे निवेदन पाठवून मुख्यालयी मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !