ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

आष्टी तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायतने नळ योजना राबवली खरी पण खरे गरजुवंत राहिले नळापासुन वंचित


आष्टी तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायतने नळ योजना राबवली खरी पण खरे गरजुवंत राहिले नळापासुन वंचित

आष्टी : तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायतने नळ योजना राबवली खरी पण खरे गरजुवंत राहिले नळापासुन वंचित आपल्या कुंबेफळ गावा मध्ये नळ योजना झाली खरी पण नामदेव तरटे म्हणाले की माझी आई शशिकला बाबुराव तरटे ही वय वृद्ध असल्यामुळे तिला निट रस्त्याने पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन चालता पण येत नाही. नळ जर माझ्या घराजवळ बसवला असता तर माझ्या आईवर ही वेळ आली नसती. ग्रामपंचायतने दोन- अडिच लाखाची नळ योजना राबवली खरी पण ती अर्धवटच केली.ठराविक लोकांच्याच दारात व तोंड पाहुन नळ बसवले.आमच्यावर अन्याय झाला आम्हाला ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी आमच्या पाण्याची नळ बसवुन व्यवस्था करून द्यावी नसता आम्ही तिव्र आंदोलनाचा पावित्रा उचलु हेही लक्षात असु द्या. व कुंबेफळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सतत गैरहजर व उपस्थित नसतात त्यामुळे ग्रामस्थांना अनेक वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या कामामधुन अडचणीं व अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामसेवक हे गेली सहा महिन्यापासुन ग्रामपंचायतला आलेच नाहीत असे ही ग्रामस्थ सांगत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button