बीड शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबार दु:खाचा डोंगर
बीड : शेतात लावलेलं सोयाबीन परतीच्या पावसाने मातीमोल झालं, तब्बल 2 एक्कर मध्ये सोयाबीनच्या लागवडीसाठी केलेली मशागत बियानाचे पैसे आणि ऐन दिवाळीत जेव्हा सोयाबीन विकून घेतलेली कर्ज फेडायची वेळ आली त्याच वेळी परतीच्या पावसाने घात केला आण सर्व सोयाबीनचा अक्षरश: डोळ्यासमोर चिखलात गेलं.
त्यामुळे आता घेतलेलं कर्ज कसं भागवायचं ? या विवंचनेतून एका 31 वर्षीय तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बीडच्या (Beed) केज तालुक्यातील जोला या गावात घडली आहे. तर आमचं 2 एकर सोयाबीन गेलं म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचललं म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने एकच टाहो फोडला, त्यामुळे ऐन तरण्याबांड शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला असून संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गणेश मारोती सारूक वय 31 रा. जोला ता. केज असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश सारूक यांची 2 एक्कर सोयाबीन पेरली होती. मात्र अतिवृष्टीने पुरतं सोयाबीन वाया गेलं. त्यामुळे सेवा सहकारी सोसायटीसह इतर खाजगी घेतलेलं कर्ज कसं फेडाव ? या नैराश्यातून कर्जबाजारीपणाला कंटाळून गणेश सारूक यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.