बीडच्या राजकर्त्यानो लाजा असतील तर रस्त्याचं, शेतकरी नुकसान भरपाईच बघा,- डॉ.जितीन वंजारे
बीडच्या राजकर्त्यानो लाजा असतील तर रस्त्याचं, शेतकरी नुकसान भरपाईच बघा,- डॉ.जितीन वंजारे
शेतात सोयाबीन भिजत आहे कापसाच्या वाती झाल्या आहेत अति प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापसाचे पीक,सोयाबीन व संपूर्ण खरिपाची पिके वाया गेली आहेत नवीन पिकाची पेरणी ही करता येईना आणि जुन पीक काढताही येईना अश्या दूविधा अवस्थेमध्ये शेतकरी असताना राजकारणी मात्र कोणतीच हालचाल करताना दिसत नाहीत या कर्तव्य शून्य अशा राजकर्त्यांना शेतकऱ्याची नुकसान,बीडच्या खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरावस्था, शेतात सडत असलेल्या सोयाबीनची पीक, वाती होऊन कर फुटलेली बाजरी,उडीद, वाया गेलेला कापूस इत्यादीची नुकसान दिसत नसेल तर बांगड्या भरून स्वतःच्या घरामध्ये बसा असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे. एका शेतकऱ्याची आत्महत्या शेतामध्ये भिजत असलेल्या आणि कर आलेल्या सोयाबीन कडे पाहून झाली अशा अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्याची तुम्ही वाट पाहत आहे का? जो तो आपली पोळी भाजून घेत आहे परंतु शेतकऱ्याचे दुःख मात्र कोणालाही नाही, वेळोवेळी प्रत्येकाच्या दुःखात धावून जाणारा, प्रत्येकाला संकटात मदत करणारा माझा शेतकरी राजा आज हवालदिल झालेला असून कर्जबाजारी झालेला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सर्वच रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही माञ आमदार, खासदाराला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अशा खराब रस्त्याची, शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाल्याची तिळमात्र काळजी वाटतं नाही. फक्तं मतदान आल्यावर आणि सत्ता गेल्यावरच फक्तं समाजसेवेचा पुळका आणणाऱ्या ढोंगी प्रतिनिधींना त्यांची जागा दाखवली पाहिजे.स्वतःला जर लाज वाटत नसेल तर तुमच्या राजकीय पदाचा राजीनामा देऊन सरळ बांगड्या भराव्यात असा खणखणीत सल्ला सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला.खड्डेमय रस्त्यामुळे अपघात वाढले,मणक्याच्या आणि हाडाच्या समस्या वाढल्या, धुळीमुळे श्वसानाचे आणि डोळ्याचे आजार वाढले.धुळीमुळे आरोग्य, रोड शेजारील शेती, वाहतूक धोक्यात आली असुन शासन,प्रशासन, राजकर्ते मूग गिळुन गप्प आहेत. जनता मात्र दे धक्का करुन जिवन जगत आहे.हे सरकार लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे नसेल तर असहकार पुकारून यांच्या जागा रिकाम्या करायला हव्यात. या जगाचा पोशिंदा शेतकरी असून शेतकरी राज्याची अशी दयनीय अवस्था पाहून तुम्हाला लाज वाटत नसेल तर बांगड्या भरून सभागृह सोडा असा सल्ला डॉ जितीनदादा वंजारे यांनी लगावला*
संबंध बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याची दुरवस्था पाहून बीड जिल्हाला सावत्रपणाची वागणूक का दिली जात आहे? याचा विचार करायला हवा. बीड जिल्हा हा प्राचीन आणि जुना जील्हा असून या जिल्ह्याचा मनाव तसा विकास झालेला नाही. भाराभर नेते याच जिल्ह्यात मोठया पक्षाचा बालेकिल्ला हाच जिल्हा मग विकास का होत नाही याला जबाबदार कोण? तीच तीच लोक पुन्हा पुन्हा येऊन जिल्ह्याची वाट लावताना दिसतं आहे.जिल्ह्यातील रस्ते,नाल्या, शिक्षण, आरोग्य, वीज, सिंचन, पानी साठे यावरती खरोखर विचार आणि मंथन होण्याची गरज आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरातील मूलभूत सुविधा यावर अवलंबून असतो. बीड जिल्ह्याचा सर्वे केल्यास जिल्ह्यातील एकही गावचा रस्ता ठीक नसल्याकारणाने बीड येथील सर्वच जनता त्रस्त असून राजकर्ते मात्र सर्रास डोळे झाकून आपल्या आलिशान गाड्यांमधून इकडे तिकडे हिंडताना दिसत आहेत. जनता मात्र दे धक्का प्रमाणे त्रस्त जिवन जगत आहे. बीडला आमदार,खासदाराची कमी नाही मोठमोठे राजकारणी याच मातीत निर्माण झाले परंतु कोणी स्वार्थासाठी जगला,कोणी समाजासाठी जगला,पण संबंध बीड जिल्ह्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण करून बीडच्या सर्वांगीण विकासासाठी एकही नेता पुढे येताना दिसत नाही त्यामूळे बीडच्या मूलभूत विकासासाठी सामान्य जनतेने समोर येण्याचे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केली.