व्हिडिओ न्युज

Video खेळता खेळता मुलीनं छोट्या मुलाला विहिरीत ढकललं…..


लहान मुलं खेळतानाच्या अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. ज्यामध्ये मुलं स्वतःला किंवा दुसऱ्याला हानी पोहोचवतात. सध्या अशीच एक घटना समोर आलीय ज्यामघ्ये एका मुलीनं खेळता खेळता एका मुलाला विहिरीत टाकून दिलं. या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय.



लहान मुले खेळताना खोड्या करत असतात मात्र एका मुलीने एका मुलाला चक्क खेळताना विहिरीत टाकलं. या घटनेनं खळबळ उडाली. याचा व्हायरल व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

https://twitter.com/cctvidiots/status/1729087628023324955?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729087628023324955%7Ctwgr%5E996907e46a18499060f0b2eecebc9e75cb798d0a%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही मुले विहिरीजवळ खेळत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर मुलगी मुलाला विहिरीजवळ नेते. मुलगी मुलाला विहिरीत उचलून टाकते. मूल रडते पण त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. त्यानंतर मूल विहिरीत बुडते आणि त्यानंतर मुलगी आजूबाजूला बघताना दिसते. मुलीलाही काय करावं समजत नाही ती इकडे तिकडे धावते.

@cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 37 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसतायेत. समोर आलेला व्हिडीओ चायनाचा आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button