शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं,शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही अशीही माहिती समोर आली आहे. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही डाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही” मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू असं ट्वीट सुषमा अंधारे यांनी केलं आहे.