क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

दारुच्या नशेत कोयत्याने त्याच्यावर वार,जागीच मृत्यू


कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसवाडी परिसरात मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) दुपारी घडली आहे.
विपिन दुबे (Vipin Dubey) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी राजेश्वर पांडे (Rajeshwar Pandey) याला पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून हा खून (Kalyan Crime) झाल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे (Kolsevadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख (Senior Police Inspector Mahendra Deshmukh) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे मागील पाच वर्षापासून एकमेकांना ओळखत असून ते चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी मयत विपिन याला पैशांची गरज असल्याने त्याने आरोपी राजेश्वर पांडे याच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीने विपिन याला साडेचार लाख रुपये उसने दिले होते. काही दिवसांनंतर आरोपीने विपिन याच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु विपिन याने पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. (Kalyan Crime)

आज दुपारी आरोपी राजेश्वर याने विपिनला आपल्या घरी पार्टी असून घरी येण्यास सांगितले. मटण आणि दारुची पार्टी केल्यानंतर राजेश्वर याने विपिनकडे पैशांची मागणी केली. तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या राजेश्वर याने दारुच्या नशेत कोयत्याने त्याच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विपीनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वत: कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फोन करुन मी मित्राला मारले असल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी त्या परिसरात असलेल्या बीट मार्शलला घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले.
बीट मार्शल घरी पोहचले त्यावेळी आरोपी घरामध्ये होता. तर विपिन याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
बीट मार्शलने पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी मृत विपिन याच्या नातेवाईकांना कळवलं.
विपिनच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी रामेश्वर पांडे याच्यावर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button