आनंदअशोक पोकळे सरपंच यांनी बसविले 80 लहान मुला़ंना रेल्वेत
आष्टी तालुक्यातील चिंचाळा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला रेल्वे प्रवासाचा आनंदअशोक पोकळे सरपंच यांनी बसविले 80 लहान मुला़ंना रेल्वेत
आष्टी : आष्टी तालुक्याचे रेल्वेचे स्वप्न साकार झाल्याने आष्टी तालुक्यातील नागरिकांचे रेल्वेत बसण्याचे स्वप्न साकार होत आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचेही रेल्वेत बसण्याची स्वप्न पूर्ण होत आहे आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील 80 विद्यार्थ्यांचे रेल्वेत बसण्याची स्वप्न सरपंच अशोक पोकळे यांनी स्वतः सर्व खर्च करून साकार केले. मुख्याध्यापक रत्नाकर चव्हाण यांच्या मदतीने गुरूवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आष्टी ते सोलापूरवाडी रेल्वेने 80 विद्यार्थ्यांना रेल्वेने सोलापूरवाडी येथे घेऊन गेले विद्यार्थ्याबरोबरच काही विद्यार्थ्यांचे पालकही प्रवास करताना दिसत होते
विद्यार्थी यांचा रेल्वे त बसण्याचा छंद सरपंच अशोक पोकळे यांनी मिटवला यांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हसू उमटले आपण पहिल्यांदा च रेल्वे मध्ये बसलोय यामुळे विद्यार्थ्यी एकदमच खुश झाले व सरपंच अशोक पोकळे यांचे टाळ्या वाजवून आभार मानले