जमिनीच्या वादातून भावाने दादा आणि वहिनीचा केला निर्घृणपणे खून
धनराजने आपल्या मोठ्या भावाला डोक्यात सबलीने (लोखंडी खंदक) मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या शारदा गुरनुले यांनाही धनरजाने मारहाण केली. यात मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला, तर शारदा यांना गडचिरोली येथे उपचारासाठी नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
जमिनीच्या वादातून लहान भावाने दादा आणि वहिनीचा निर्घृणपणे खून केल्याचा संतापजनक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गायडोंगरी गावामध्ये घडला. मनोहर गुरनुले (वय – 62) आणि शारदा गुरनुले (वय – 58) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पाथरी पोलिसांनी आरोपी धनराज गुरनुले याला अटक केली आहे.
गायडोंगरी गावातील मनोहर गुरनुले यांचा लहान भाऊ धनराज गुरनुले यांच्यात जमिनीवरून वाद होता. हा वाद एवढा विकोपाला पोहोचला की धनराजने आपल्या मोठ्या भावाला डोक्यात सबलीने (लोखंडी खंदक) मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या शारदा गुरनुले यांनाही धनरजाने मारहाण केली. यात मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला, तर शारदा यांना गडचिरोली येथे उपचारासाठी नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळत पाथरी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. पुढील तपास सावली पोलीस निरीक्षक मंगेश मोहाड करीत आहे.