क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे
दारूबंदी अधिकारी यांचा जास्त दारू प्यायल्यामुळे मृत्यू
महाड : महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्याला नेहमी अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय होती. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी साडेचार वाजता महाड ग्रामीण रुग्णालयात घडली.
महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय, महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणून कार्यरत होते. त्यांना नेहमी अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय होती. बुधवारी जास्त प्रमाणात दारू प्राशन केल्याने त्यांचा महाड ग्रामीण रुग्णालयात दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला.
या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कापडेकर करीत आहेत.