उपमुख्यमंत्र्याचे शहर नागपूरचा गुन्हागारीमध्ये राज्यात पहिला क्रमांक
नागपूर : नागपूर शहराचा गुन्हागारीमध्ये राज्यात पहिला क्रमांक आहे. तर देशात आठवा क्रमांक आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेदर लक्षात घेत नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबई, पाटणा, गाझियाबाद, लखनौ यांसारख्या शहरांना मागे सोडले आहे. एनसीबीची ही आकडेवारी नागपूर पोलिस प्रशासन तसेच राज्य पोलिस प्रशासनावर अंजन टाकणारी आहे.
आकडेवारी नुसार 2021 मध्ये नागपूर शहरात 22 हजार 302 गुन्हे नोंद झाले आहेत. तर 2020 च्या तुलनेत हा आकडे 15.85 टक्क्यांनी वाढला असल्याचं सांगितले आहे. 2021 मध्ये आयपीसी अंतर्गत 13 हजार 312, तर एसएलएल अंतर्गत 8 हजार 990 गुन्ह्यांचा समावेश आहे. 2021 चा दखलापत्र गुन्ह्यांचा दर लाखाला 892.8 इतका आहे.
राज्यात मुंबई व पुणे शहरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकसंख्या जरी जास्त असली तरी देखील गुन्हागारी दर नागपुरपेकक्षा कमी आहे. मुंबईच्या तुलनेत नागपूरचा गुन्हागारी दर दुप्पट आहे. तर पुण्याच्या तुलनेत नागपूरचा गुन्हागारी दर तब्बल साडेतीन पट आहे. पुण्यात गुन्ह्यांची आकडेवारी लोकसंख्येच्या अनुशंगाने व नागपूरपेक्षा खुपच कमी आहे.
सोबतच, हिंसक गुन्ह्यांमध्ये नागपूर देशात दुसऱ्या तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये 1 हजार 409 हिंसक गुन्हे नागरूच शहरात नोंदवण्यात आले आहेत. तर हत्येचा दर हा 56.4 इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. या नुसार देशात नागपूर दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे गुन्हे रोखण्याची नागपूर पोलिस प्रशासन व राज्य पोलिस प्रशासनावर मोठी दबाबदारी