कोरियन आई (Korean mother) तिच्या मुलाला भारताचं राष्ट्रगीत (‘Jan-Gan-Man’) शिकवते आहे
‘जन- गण- मन’ हे भारताचंराष्ट्रगीत (National Anthem of India) आपण जेव्हा म्हणतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याही नकळत अंगामध्ये देशभक्तीचं एक वेगळंच स्फूरण चढतं.
हीच उर्जा आपल्या लेकालाही मिळावी, त्यालाही भारताच्याराष्ट्रगीताबाबत आत्मियता वाटावी, यासाठी एक कोरियन आई (Korean mother) तिच्या मुलाला भारताचं राष्ट्रगीत (‘Jan-Gan-Man’) शिकवते आहे. कोरियन आई आणि तिच्या मुलाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे.
हा जो कोरियन मुलगा आहे, त्याचं वय अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे असावं असं वाटतं. त्याच्या आईच्या ज्या काही वेगवेगळ्या इन्स्टाग्राम पोस्ट आहेत,
त्यावरून असं कळत आहे की या मुलाची आई कोरियन आणि वडील भारतीय आहेत. त्यामुळे त्याची आई कोरियन आणि भारतीय या दोन्ही संस्कृतीशी त्याची ओळख करून देऊ पाहते आहे. तिचा हा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे. राष्ट्रगीताच्या या व्हिडिओमध्ये आई राष्ट्रगीतातील एकेक शब्द उच्चारत आहे आणि तिच्या पाठोपाठ तो चिमुकल्या त्याच्या बोबड्या बोलांत राष्ट्रगीत म्हणतो आहे. राष्ट्रगीताच्या शेवटी त्याने म्हटलेलं जय हिंद ऐकायला खूपच गोड वाटतं.
छोट्याशा मुलाचा आणखी एक छान व्हिडिओ आहे, ज्यात त्याला त्याच्या घरातली मंडळी हिंदी भाषा बोलायला शिकवत आहेत.