ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेशेत-शिवारसंपादकीय

घरावर नितांत प्रेम,आपले घर मूळ जागेवरून ५०० फूट अंतरावर सरकवत आहे


असे सरकते घर

सुखविंदरसिंग सुखी यांनी कामाला सुरुवात केली. गावातील बांधकाम मजुरांच्या मदतीने घराला जॅक्स लावून वर उचलण्यात आले.
रेल्वेपटरीसारख्या मजबूत लोखंडी पटरीवरून घर हळूहळू सरकाविण्यात येत आहे. २५० फूट अंतर त्याने पार केले आहे. आणखी एवढेच अंतर पार करावे लागणार आहे.
– जॅक्स, गीअर आणि चाकांच्या मदतीने अख्खे घरच हलविण्यात येत असल्यामुळे हा संपूर्ण पंजाबातील एक चर्चेचा विषय झाला आहे. लोक दूरदूरून घराचे स्थलांतर पाहायला येत आहेत.
– काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनीही त्याची दखल घेतली आहे. घर हलविण्यात येत असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत

पंजाब : पंजाबातील एक शेतकरी चक्क आपले घरच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालला आहे.

मोठ्या प्रेमाने बांधलेले १.५ कोटी रुपये किमतीचे हे घर त्याला ५०० फूट अंतरावर सरकवून घ्यायचे असून, २५० फुटांपर्यंत ते सरकवण्यातही आले आहे. महामार्गाच्या वाटेत हे घर आल्यामुळे या शेतकऱ्याने अख्खे घरच सरकविण्याचा निर्णय घेतला.

घरावर नितांत प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे सुखविंदरसिंग सुखी. पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील रोशनवाला गाव शिवारात त्याने हे घर बांधले आहे. घर बांधायला त्याला २ वर्षे लागली, तसेच १.५ कोटी रुपये खर्च आला. मात्र, इतके प्रेमाने बांधलेले त्याचे हे घर दिल्ली- अमृतसर- काटरा एक्स्प्रेस-वेच्या मार्गात आले आहे. केंद्र सरकारचा हा महामार्ग भारतमाला प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. हरयाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना तो जोडणार आहे.

महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आले तेव्हा पंजाब सरकारने सुखी यांना घराबद्दल नुकसानभरपाई देऊ केली होती. तथापि, भरपाई घेऊन पुन्हा नवे घर बांधण्याऐवजी सुखी यांनी आहे ते घरच रस्त्याच्या जागेवरून बाजूला सरकवून घेण्याचा निर्णय घेतला. महामार्गाला वाट मोकळी करून देण्यासाठी सुखी यांना आपले घर मूळ जागेवरून ५०० फूट अंतरावर सरकवून घ्यावे लागणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button