नकली पोलिस स्टेशनवर धाड, पोलीस ठाणे गेल्या आठ महिन्यांपासून परिसरात सक्रिय
पाटणा – बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याच्या अनेक कहाण्या नेहमीच चर्चेत येत असतात. बिहारमध्ये बोगस पोलीस कर्मचारी पकडले जात असतात. मात्र यावेळी गोष्टी जरा अधिकच गंभीर आहे.
यावेळी एक संपूर्ण पोलीस स्टेशनच बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पोलीस ठाणे गेल्या आठ महिन्यांपासून परिसरात सक्रिय होते. तसेच लोकांकडून पैसे उकळत होते. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा मुख्यालयात सुरू असलेल्या या बोगस पोलीस ठाण्याची कुणाला कानोकान खबर नव्हती. हे पोलीस ठाणे बांका शरहातील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये सुरू होते.
बिहार मधील बांका गावात बुधवारी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत ‘कर’ शहरातील अनुराग गेस्ट हाउस मध्ये बेकायदेशीर पणे चालवात आसलेल्या नकली पोलिस स्टेशनवर धाड टाकली आणि त्याचा पर्दाफाश केला.
या छाप्यात पोलिसांनी नकली पोलिसांच्या वर्दी मध्ये असलेल्या एका युवकाला अटक केला आहे. त्याचबरोबर एका युवतीला सुध्दा अटक केली आहे. तिच नाव अनिता देवी अस आहे. तिच्या जवळ दोन गावठी पिस्तुल सापडल्या आहेत.तिने सांगितल की त्या पिस्तुली तिला वरिष्ठ आधिकाऱ्यांनी चालवायला शिकण्यासाठी दिल्या आहेत. तिने दावा केला की झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आदेशानुसार त्यांनी हे स्टेशन स्थापन केल आहे.
नकली पोलिस स्टेशन मध्ये लेखपाल म्हणुन काम करत आसलेला फुल्लीडुमर च्या लौढिया गावातील रहिवाशी रमेश कुमार आणि सुल्तानगंज मधील खानपुर मधील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच बरोबर आकाश कुमार नावाच्या युवकाला पोलिसांच्या नकली वर्दी आणि काही कागतपत्रा सोबत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर सांगितल की हे सगळ त्याच्या वरिष्ठ आधिकारी भोला यादव याच्या आदेशावर चालत होत. आरोपी भोला यादव फुल्लीडुमर भागातील रहिवाशी आहे.
आरोपींनी सांगितले की त्यांच्या कामाच्या बदल्यात त्यांना रोज म्हणून 500 रुपये मिळत होते. पोलिसांनी त्याच्या खासगी स्वयंपाकीलाही गेस्ट हाऊसमधून अटक केली असून सध्या तीची चौकशी चालू आहे. या प्रकरणाबाबत एसडीपीओ डीसी श्रीवास्तव यांनी सांगितले की, बनावट पोलिसांची टोळी चालवणारा मुख्य गुंड अद्याप फरार आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल.