राजकीय

मनसे लोकसभेच्या 22 जागा लढवण्याच्या तयारीत? संभाव्य उमेदवारांची नावंही चर्चेत


लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषगांने बैठका आणि इतर हालचाली मनसेने सुरू केल्या आहेत. मनसे लोकसभा निवडणुकीत पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं दिसून येत आहे



मनसेची सोमवारी लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर काही जागांवरील संभाव्य उमेदावारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मनसे मुंबईतील सर्व सहा जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. तर ठाणे, कोकण येथे प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार देऊ शकते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्याच्या तयारीत मनसे आहे.

दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतीच्या सर्व जागी मनसेकडून उमेदवार दिले जाऊ शकतात. कल्याणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांचं नाव चर्चेत आहे. बारामती किंवा पुण्यातून वसंत मोरे तर सोलापूर मधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे.

एकूण 22 जागा कोणत्या?

मुंबई – ६

ठाणे- ३

कोकण -३

पुणे – ४

नाशिक – २

कोल्हापूर

सोलापूर

अमरावती

चंद्रपूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button