क्राईमताज्या बातम्यामहत्वाचे

नवीन नवरी नवरदेवासोबत मार्केटमध्ये गेली. नवऱ्याला मिठाई विकत घेण्यासाठी दुकानात पाठवलं.अन स्वत: प्रियकराच्या बाइकवर बसून फरार …


अहो ऐका, सासरी मी रिकाम्या हाताने जाणार नाही. मार्केटमधून मिठाई घेऊन या. नवीन नवरी नवरदेवासोबत मार्केटमध्ये गेली. नवऱ्याला मिठाई विकत घेण्यासाठी दुकानात पाठवलं. त्यानंतर स्वत: प्रियकराच्या बाइकवर बसून पळून गेली.

नवरा दुकानातून बाहेर आल्यावर तिला शोधत होता. त्याचवेळी त्याच्या मोबाइलवर पत्नीचा फोन आला. तो, तू कुठे आहेस विचारणार, इतक्यात ती समोरुन बोलली, मी माझ्या जानसोबत चालली आहे. मला तुमच्यासोबत लग्न करायचचं नव्हतं. हे ऐकून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

नवऱ्याने तात्काळ पत्नीच्या घरच्यांना सांगितलं. त्यानंतर सगळ्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. बघता, बघता सगळ्या भागात ही गोष्ट पसरली. अचानक झालेल्या या घटनाक्रमामुळे गावात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. बिहारच्या मुंगेरमधील हे प्रकरण आहे. बरियापूर पोलीस ठाणे क्षेत्रात राहणारी नवविवाहिता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यासाठी तिने आधीपासूनच प्लान तयार केला होता.

हे त्याला माहित नव्हतं

मिळालेल्या माहितीनुसार, युवतीचं लग्न 23 नोव्हेंबरला झालेलं. 27 नोव्हेंबरला ती पती सोबत माहेरी आलेली. पती तिच्यासोबत होता. परत जायची वेळ आली, त्यावेळी ती बोलली की, मी रिकाम्या हाताने सासरी जाणार नाही. तिने नवऱ्याला मिठाई आणायला दुकानात पाठवलं. पत्नीच्या डोक्यात काय चाललं आहे? हे त्याला माहित नव्हतं.

जसा मिठाईच्या दुकानात शिरला

नवरा जसा मिठाईच्या दुकानात शिरला, मागून बाईकवरुन प्रियकर आला. नवरी त्याच्या बाईकवर बसून निघून गेली. त्यानंतर तिने पतीला फोन केला. सांगितलं की, ती तिच्या प्रियकरासोबत जात आहे. त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. पण घरातल्यांच्या सांगण्याने मजबुरीमध्ये लग्न केलं. आती ती संपूर्ण आयुष्यात तिच्या प्रियकरासोबत घालवणार आहे.

पतीने सासरच्यांना ही माहिती दिली. आता या प्रकरणाची सगळ्या भागात चर्चा आहे. बिचाऱ्या नवऱ्याला पत्नीशिवाय घरी परतावं लागलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button