ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल…


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे.

नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील 246 नगरपरिषदांच्या जागांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त जागा जिंकण्यात भाजपला यश मिळाले आहे. भाजप राज्यात सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचे पुन्हा एकदा निकालाने सिद्ध केले आहे. यानंतर शिवसेना शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाने देखील खेड्यागावांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांचा दबदबा दिसून आला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा विजय मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण 17 महत्त्वाच्या नगरपरिषद आणि नगरपालिका 9 जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि गुलालाची उधळण करत राष्ट्रवादीने विजय साजरा केला आहे. सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण असून अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगदी एका वाक्यामध्ये आपली प्रतिक्रिया दिली. “जिल्हा कोणाच्या मागे आहे बघा” अशी एका वाक्यात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत. महायुतीच्या पहिल्या टप्प्यातील सत्तेवेळी पुण्यातील पालकमंत्री पदावरुन अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सुरस दिसून आली होती. यानंतर आता झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमधून अजित पवारांनी पुण्यामध्ये आपली ताकद दाखवून दिली. पुण्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील अजित पवारांना मोठे समर्थन असून मतदार देखील त्यांच्याच पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बारामती, इंदापूर आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून येणे ही अजित पवारांसाठी मोठा विजय मानला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा
1 लोणावळा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
2 तळेगाव – बहुमत राष्ट्रवादीचा मात्र नगराध्यक्ष भाजपचा
3 दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
4 चाकण – शिवसेना शिंदे गट
5 शिरूर- बहुमत भाजपचा आणि नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
6 इंदापूर- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
7 सासवड – भाजप
8 जेजुरी – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
9 भोर – बहुमत भाजपला मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
10आळंदी – भाजप
11 जुन्नर – शिवसेना शिंदे
12 राजगुरुनगर – शिवसेना शिंदे गट
13 बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
14 फुरसुंगी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

पुणे जिल्ह्यातील नगर पंचायत

1 वडगाव मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
2 मंचर – शिवसेना शिंदे
3 माळेगाव – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button