जनरल नॉलेजताज्या बातम्यामहत्वाचेलोकशाही विश्लेषण

महागडी दारू खरंच कमी चढते? कारण तरी काय, तुम्ही म्हणाल हेच तर माहिती नव्हतं..


महागडी दारू ही स्वस्त दारुच्या तुलनेत अधिक हलकी आणि चवीला ही भारी असते. ती कमी चढते. अनेक लोकांचे असे मत आहे की, महागडी वाईन आणि महागडा वोडका यामध्ये अल्कोहलची मात्रा कमी असते.

त्यामुळेच ती कितीही पिली तरी एका पिक पॉईंटनंतर ती उतरते. तर उलट कमी प्रतीच्या आणि किंमतीची दारू ही अधिक काळ चढलेली असते. पण या दाव्यात किती सत्यता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? खरंच महागडी दारू कमी चढते का? यामध्ये खरंच अल्कोहलचं प्रमाण कमी असतं का? काय आहे यामागील सत्यता?

दारू आणि अल्कोहलची मात्रा

कोणत्याही दारुची नशा ही त्याच्या किंमतीवरून नाही तर ABV म्हणजे Alcohol By Volume ने निश्चित होते. तर बाजारात मिळणारी दारू ती महगा असो वा स्वस्त सर्वांमध्ये ABV 40 टक्के असतो. म्हणजे दारूची नशा चढण्याचे कारण किंमत नाही तर अल्कोहलच्या प्रमाणावर आधारीत आहे. जर महागडी दारुतही अल्कोहलचे प्रमाण अधिक असेल तर अशी दारू चढते. अल्कोहलच्या प्रमाणावर दारूची नशा किती चढते हे ठरते.

महागड्या दारूत किती असते अल्कोहल?

दारुतील अल्कोहल कंटेंट हा त्याच्या किंमतीवर नाही तर तो तयार करण्याच्या प्रक्रियेवर आणि कोणत्या गोष्टींचा दारू तयार करण्यासाठी वापर करण्यात आला त्यावर अवलंबून असते. वाईनमध्ये 11 ते 15 टक्क्यांपर्यंत अल्कोहलचे प्रमाण असते. मग ती स्वस्त अथवा महागडी दारू असो, त्यात त्याच प्रमाणात अल्कोहल असते. तर महागड्या वाईन, तिची चव, गुणवत्ता आणि पॅकेजिंग यावर दिसून येते. वाईनच्या चवीला ही अनेक ग्राहक प्राधान्य देतात.

मग दारू कमी का चढते?

पण अनेकांच्या मनात एक कायम प्रश्न असतो की स्वस्त दारू अधिक चढते आणि महागडी दारू कमी चढते. यामागे एक कारण मानल्या जाते. त्यानुसार महागड्या दारूत कॉन्जेनर म्हणजे अशुद्धता कमी असते. त्यामुळे हँगओव्हर होत नाही. तर स्वस्त दारुची प्रक्रिया किती शुद्ध असते हे सांगता येत नाही. तसेच बाजारात अनेक ब्रँडच्या बोगस दारुचा भडीमार असतो. वेळोवेळी कारवाईतून ही बाब समोर आली आहे. डुप्लिकेट दारुत कोणतेच प्रमाण योग्य नसल्याने ती अधिक चढते आणि ती शरिरासाठी सुद्धा अपायकारक ठरते. त्यामुले शरीर सुस्त आणि डोके सुन्न होते. हँगओव्हर दुसऱ्या दिवशी कायम राहतो.

तर केवळ किंमतीवरच नाही तर तुम्ही दारु कशी पिता हे पण अनेकदा महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अनेक जण भराभर दारू पितात. ते खात ही नाही. दारुचे घोटावर घोट रिचवतात. त्यामुळे दारु अधिक चढते. तर काही जण दारू ही अगदी हळूहळू आणि कमी पितात. ते एका निश्चित मर्यादेबाहेर दारुला शिवत सुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना हँगओव्हर होत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button