धार्मिकलोकशाही विश्लेषण

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले भारतातील सर्वात लोकप्रिय शहर पुन्हा जगाच्या नकाशावर दिसणार; भगवान श्रीकृष्ण इथचं रहायचे?


भविष्यात अनेक देश समुद्रात बुडतील असा इशारा संशोधकांनी दिलेला आहे. मात्र, याआधी देखील अनेक शहरं समुद्राने गिळंकृत केली आहेत. असचं एक शहर आपल्या भारतात देखील आहे.

हे शहर म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची द्वारका नगरी. श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असं म्हटलं जातं. 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन घेता येणार आहे.

 

भारतीय पुरातत्व विभागाने 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णाच्या द्वारका नगरी शोधून काढली आहे. समुद्राच्या तळाशी संशोधकांना द्वारकेचे अवशेष सापडले आहेत. समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णाच्या द्वारकेचे भाविकांना देखील दर्शन घेता येणार आहे. गुजरात सरकार समुद्रात बुडालेले द्वारका शहर दाखवणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक पर्यटन होणार आहे. पाणबुडीच्या माध्यामतून समुद्रात 300 फूट खाेलवर असलेल्या द्वारकेचे दर्शन घेता येणार आहे.

 

5 हजार वर्षांपूर्वी श्री कृष्णाची द्वारका नगरी समुद्रात बुडाली

 

5 हजार वर्षांपूर्वी श्री कृष्णाची द्वारका नगरी समुद्रात बुडाली. समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे दर्शन आता सहज शक्य होणार आहे. गुजरात सरकाराने द्वारका दर्शनासाठी अरबी समुद्रात ‘प्रवासी पाणबुडी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अनोख्या पर्यटनासाठी भारत सरकारची कंपनी माझगाव डाॅक शिपयार्डसाेबत गुजरात सरकारने करार केला आहे.

 

द्वारका दर्शनसाठी स्वदेशी पाणबुडीचे संचालन माझगाव डाॅक करणार आहे. ही प्रवासी पाणबुडी समुद्रात 300 फूट खाेलवर जाणार आहे. दाेन ते अडीच तासांची ही राेमांचक सफर असणार आहे. केंद्र सरकार देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला प्राेत्साहन देत आहे. या अंतर्गतच हा प्रकल्प राबवला जाणार आहे. द्वारका काॅरिडॉरअंतर्गत मूळ द्वारकेच्या (बेट द्वारका) दर्शनासाठी पाणबुडी प्रकल्प राबवला जाणार आहे. बेट द्वारकेत अरबी समुद्रात सर्वात माेठा केबल पूल तयार केला जाणार आहे. याद्वारे लोकांना द्वारका परिक्रमेचा अनुभव घेता येणार आहे.

 

ही पाणबुडी 35 टन वजनाची असणार आहे. या पाणबुडीत एकावेळी 30 लाेक बसू शकतात. यात मेडिकल किटही असेल. या पाणबुडीत 24 प्रवाशी दाेन रांगेत बसतील अशी आसन व्यवस्था असेल. दाेन चालक, 2 मानवी पाणबुड्या, एक गाइड व एक तंत्रज्ञ साेबत असेल. संकट समयीचा मार्ग म्हणून प्रत्येक आसनाला खिडकी असेल. यातून सागरतळातील नैसर्गिक साैंदर्य सहजपणे पाहता येऊ शकेल. देवभूमी काॅरिडॉरअंतर्गत बेट द्वारकाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. सर्वात माेठे आकर्षण सिग्नेचर ब्रिज आहे. 900 काेटी रुपयांत 2320 मीटर लांबीचा हा चाैपदरी पूल भारतातील सर्वात माेठा केबल पूल असेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button