पतीनेच आपल्याच पत्नीनी निघृणपणे हत्या केली जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचंच मुंडकं छाटून पोलीस ठाण्यात नेलं …

बंगळुरुत एक धक्कादायक घटना घडली
आहे. पतीनेच आपल्याच पत्नीनी निघृणपणे हत्या केली आहे. पतीनेच आपल्या पत्नीचा चिरलेला गळा पोलीस ठाण्यात नेला आणि खून केल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यासंबंधित आता पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरुतील चांदापुरा जवळील हीलालागे गावातील आहे. दरम्यान, आरोपीचे नाव शंकर असून त्याचे वय वर्षे 28 आहे. तर मृत पत्नी मनसाचे वय वर्षे हे 26 असून ती बेब्बागोडी येथील राहिवासी होती. दोघांचेही प्रेमविवाह झाला होता. काही काळ ते भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, शंकर हा कामानिमित्त गेल्यानंतर रात्री उशीरा घरी परतला असताना ही घटना घडली आहे.
त्याने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये वादंग निर्माण झाला. शंकरने दोघांनाही मारहाण केली, त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा गळा चिरत खून केला. शंकरने केलेल्या कृत्यावर पोलीस चक्रावून गेले.
दरम्यान, या घटनेत पोलिसांसमोर आरोपी सरेंडर झाला आणि सांगितले की, त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली. याचपार्श्वभूमीवर पोलिसांचे म्हणणं आहे की, शंकर आणि मनसा यांच्यात वारंवार वादविवाद व्हायचा. मनसाला शंकरपासून वेगळं व्हायचं होतं. तिने अनेकदा शंकरला मानसिक त्रासही दिला होता. गुरुवारी रात्री ती पुन्हा घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर ही घटना घडली.
सूर्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मनसासोबत तरुण नेमका कोण होता? याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी जाऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.
क्या इस बहन ने अपनी बेटी को मारकर बोरी में बंद करके Train में छोड़ दिया ? Bageshwar Dham Sarkar