स्तंभेश्वर महादेव मंदिर समुद्रात स्थित,हे मंदिर २ वेळा पाण्यात जाते
मुंबई: श्रावण महिन्यात शिव मंदिरांमध्ये दर्शनसाठी जाणे तसेच प्रमुख तीर्थस्थळी जाणे खूप लाभदायक असते. यामुळेच श्रावण महिन्यात मुख्य शिव मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी असते.यातील अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि त्यांच्याशी संबंधित रहस्यांमुळे जगभरातील लोक दर्शन करण्यासाठी येथे येतात. गुजरातच्या वडोदरामध्येही असेच प्रसिद्ध मंदिर आहे जे दररोज गायब होते आणि पुन्हा दिसते. ही घटना पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येतात.
समुद्रात स्थित आहे हे शिव मंदिर
भगवान शंकराचे हे प्रसिद्ध मंदिर स्तंभेश्वर महादेव मंदिर समुद्रात स्थित आहे. अशी मान्यता आहे की हे मंदिर शंकराचे पुत्र कार्तिकेययांनी स्थापित केले होते. समुद्राच्या आत हे मंदिर २ वेळा पाण्यात जाते आणि पुन्हा दिसू लागते. दररोज समुद्रामध्ये याचा जलस्तर वाढल्याने मंदिर बुडते आणि जलस्तर कमी झाल्याने मंदिर पुन्हा दिसू लागते. ही घटना दररोज सकाळ आणि संध्याकाळी होते
शिवमंदिर समुद्रात बुडल्याने आणि पुन्हा दिसण्याच्या या घटनेला भक्तगण समुद्राचा शिवजीला अभिषेक केल्याचे सांगतात. जेव्हा समुद्राचे पाणी वाढू लागते तेव्हा काही कालासाठी मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश बंदी केली जाते. स्कंद पुराण आणि शिव पुराणाच्या रुद्र संहितेमध्ये स्तंभेश्वर तीर्थ बाबत सांगितले आहे की राक्षस ताडकासुरने कठोर तपस्या करत शंकरांकडून वरदान घेतले होते की त्याचा वध केवळ शंकराचा पुत्रच करू शकतो. यानंतर ताजजकासूराच्या उत्पातापासून लोकांची सुटका करण्यासाठी केवळ ६ दिवसांच्या कार्तिकेयने ताडकासुराचा वध केला होता.