SHOLAY : सुरुवातीला फक्त एकाच थिएटरमध्ये हाऊसफुल्ल झालेला शोले ; काय घडलं नेमकं ?
बॉलिवूड सगळ्यात गाजलेला सिनेमा म्हणजे शोले. बॉलिवूड मधील क्लासिक सिनेमा ठरलेला शोले सुरुवातीला फ्लॉप ठरला होता आणि त्यानंतर तो सुपरहिट झाला. पहिल्या दोन -तीन आठवड्यात हा सिनेमा चालला नाही पण एका थिएटरमध्ये हा सिनेमा सुपरहिट सुरु होता.
काय घडलं नेमकं ? एकाच थिएटरमध्ये सिनेमा चालण्याचं कारण काय जाणून घेऊया.
अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं कि, एका चुकीच्या फितीमुळे हा सिनेमा त्या थिएटरमध्ये सुपरहिट झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे थिएटर बोमन इराणी यांच्या दुकानासमोर असल्याचंही ते म्हणाले.
रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन यांनी सांगितलं कि, “शोले पहिल्या दिवसापासून सुपरहिट होता. बोमन यांनी बरोबर सांगितलं मिनर्व्हा थिएटर पहिल्या दिवसापासून हाऊसफुल होतं. रमेश सिप्पी खूप घाबरले होते कारण त्यांनी 1 करोड रुपयांपासून त्यांनी या सिनेमाला सुरुवात केलेली आणि हा सिनेमा संपला तेव्हा बजेट 3 करोड झालं होतं. रमेश यांनी त्यातील जो विनोदी पार्ट होता जगदीप साहेब आणि असरानी यांचा तो काढला होता. कारण त्यांना वाटत होतं कि तो सिनेमात बसत नाहीये. ती प्रिंट संपूर्ण देशात पोहोचली होती पण मिनर्व्हा थिएटरमध्ये जी फिल्म होती ती 70 एमएम ची होती आणि त्याची प्रिंट लंडनहून ब्लोनअप होऊन आली होती. त्यातुन तो पार्ट ते काढू शकले नाहीत कारण त्याला हात लावणं शक्य नव्हतं. त्यामुळे हा सिनेमा सुरुवातीला बाकी ठिकाणी चालला नाही पण मिनर्व्हा मध्ये हा सिनेमा सुरुवातीपासून सुपरहिट होता. ”
शोलेचं बजेट 3 करोड होतं पण या सिनेमाने थिएटरमध्ये 35 करोड रुपयांची कमाई केली होती. अमजद खान, अमिताभ बच्चन, जया भादुरी, धर्मेंद्र, हेमामालिनी आणि संजीव कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.