जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनसोबत मृत्यूनंतर शोकांतिका ! शवपेटीतून मृतदेह गायब
वैयक्तिक जीवनात दुःख असूनही संपूर्ण जगाला आपल्या अभिनयाने मनमुराद हसायला लावणारे अभिनेते चार्ली चॅप्लिन यांचे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या अभिनयाची खास शैली होती.
त्यांची पडद्यावर एंट्री होताच लोक थिएटरमध्ये टाळ्यांचा गजर करत आणि चित्रपटाचा मनसोक्त आनंद घेत. चार्ली चॅप्लिन यांचे जीवन संघर्षमय होते. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूनंतर तीन महिन्यांनी कबरीतून त्यांचा मृतदेह गायब झाला होता. हा प्रकार कसा घडला होता.
मंचावर त्यांचा प्रवेश होताच प्रेक्षक पोट धरून हसत. त्यांचे चित्रपट पाहताना लोक हसून हसून दमून जायचे. दुसऱ्यांना मनसोक्त हसवणाऱ्या या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनात दुःखाचा डोंगर होता. जगातील सर्वात मोठा विनोदी अभिनेता चॅप्लिन यांचं जीवन संघर्षमय राहिलं. निधनानंतर त्यांचा मृतदेह दफन केला गेला. पण त्या मृतदेहाला सुद्धा शांती मिळाली नाही. एक अशी घटना जी चार्ली चॅप्लिनसह इतिहासात अमर झाली. या घटनेच्या स्मृतीच्या निमित्ताने पूर्ण प्रकरण काय होते ते पाहूया.
चार्लीचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडनंमध्ये झाला. त्यांचे बालपण खूप प्रतिकूल परिस्थितीत गेले. वडिलांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक होती. यामुळे त्यांच्या आईला मानसिक आजार झालेला होता. यामुळे वयाच्या सातव्या वर्षी चार्ली यांना एका आश्रमात राहावं लागलं. यामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. जीवनात कोणताही रस्ता दिसत नव्हता. वयाच्या 13 व्या वर्षी चार्लीने मनोरंजन करण्याचा निश्चय केला आणि नृत्य करण्याचा निर्णय घेतला. ते हळूहळू नाटकात काम करू लागले. त्यानंतर अमेरिकी फिल्म स्टुडिओनं चॅप्लिनची निवड केली आणि त्यानंतर अभिनयाच्या जोरावर मूक चित्रपटांचा राजा म्हणून जगात लोकप्रिय झाले.
कॉमेडी किंग चार्ली चॅप्लिन यांना 1973 मध्ये `लाइम लाइट` या चित्रपटासाठी बेस्ट म्यूझिक श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे हा चित्रपट 21 वर्षापूर्वी बनवला गेला पण लॉस एंजेलिसमध्ये तो 1972 पूर्वी प्रदर्शित झाला नव्हता. चित्रपट रिलीज झाल्यावर त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले. या चित्रपटासाठी चार्ली यांना ऑस्कर प्रदान केला गेला, तेव्हा सभागृहातील लोकांनी उभे राहत टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली. सभागृहात 12 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्यानंतर लोक शांत झाले. चार्ली चॅप्लिन यांना 1975 मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नाइट ही उपाधी दिली. टाइम मॅगेझिनच्या मुखपृष्ठावर त्यांचा फोटो प्रकाशित झाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले अभिनेते होते. त्यांचे चित्रपट कम्युनिस्ट विचारधारेनं प्रेरित असल्याचे सांगत अमेरिकेत त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. चार्ली चॅप्लिन अभिनयातून स्वतःची खिल्ली उडवत लोकांना हसवत. 1940 मध्ये त्यांचा `द ग्रेट डिक्टेटर` हा चित्रपट आला. यात त्यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरची भूमिका करून त्याची चेष्टा केली होती. आज देखील लोकांना त्यांची ही भूमिका आवडते.
अभिनय आणि खास स्टाइलने जगाला हसवणाऱ्या या अभिनेत्याचे 25 डिसेंबर 1977 रोजी निधन झाले. त्यांचा मृत्यू ख्रिसमसच्या दिवशी झाला. त्यांचे शव पारंपरिक पद्धतीने स्वित्झर्लंडमधील जीनिव्हामध्ये एका तलावानजीक दफन केले गेले. निधनानंतर तीन महिन्यांनी कबरीतून त्यांचा मृतदेह गायब झाला होता. कबर खोदून शवपेटी बाहेर काढण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, काही लोकांनी चार्ली यांच्या पत्नीशी संपर्क साधून मृतदेह चोरल्याचे सांगितले. तसेच तो परत देण्याच्या मोबदल्यात चार लाख पौंडची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगानं सुरू केला. अखेरीस 17 मे 1978 रोजी पोलिसांनी चार चोरांना अटक केली आणि त्यांच्याकडून चार्ली चॅप्लिन यांची शवपेटी जप्त केली. हे दोन्ही चोर/ बुल्गारियातील मेकॅनिक होते. त्यांना शव बाहेर काढण्यासाठी मोठ्या रकमेचं अमीष दिलं गेलं होतं. पैसे तर मिळेलच नाही पण त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.