गोविंदाचं वेदनादायी आयुष्य, तीन पैकी दोन बहिणींना गमावलं, तीनही भावोजींचा मृत्यू ;असं घरात नेमकं घडल काय ?
भाची आरती सिंहच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यापासून अभिनेता गोविंदा देखील खूप चर्चेत आला आहे. भाचा कृष्णा अभिषेक व गोविंदा यांच्यातील वाद हे जगजाहीर होते. त्यामुळे आता मामा गोविंदा भाचीच्या लग्नाला ऊपस्थित राहणार की नाही याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या होत्या.
पण गोविंदाने आरतीच्या लग्नाला उपस्थित राहिला आणि सराव प्रश्नांना पूर्णविराम लागला. यानिमित्ताने गोविंदाच्या कुटुंबात सर्व काही आलबेल असल्याचे संमोर आले. याबरोरबच आता गोविंदाच्या आयुष्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी आता संगळ्यांसामोर आल्या आहेत. आपल्या अभिनयाने गोविंदाने चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. परंतु गोविंदाचा हा प्रवास मात्र सोपा नव्हता. आज आपण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेऊया. (actor govinda sisters)
सध्या गोविंदा चित्रपटांपासून दूर असलेला दिसून येतो. मात्र त्याने 80 व 90 च्या दशकामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचवेळी त्याने सुनीताबरोबर लग्नगाठही बांधली. परंतु याबद्दल त्याने कोणालाही कळू दिले नव्हते. लग्नानंतर काही वर्षांनी याबद्दल सर्वांना त्यांच्या लग्नाबद्दल समजले. त्यानंतर अनेक वर्षांनी तो त्याची पत्नी व मुलांबरोबर दिसून आला होता.
गोविंदाच्या आई-वाडिलांबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या वडिलांचे नाव अरुण कुमार आहुजा होते. ते देखील अभिनेते व निर्मातेदेखील होते. तसेच आईचे नाव निर्मलादेवी होते. त्या देखील अभिनेत्री व गायिका होत्या. गोविंदाच्या जन्माबद्दल सांगितले की, जेव्हा गोविंदाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घेण्यासाठी नकार दिला होता.
तसेच काही वर्षांनी गोविंदाची बहीण पुष्पा आहुजा आनंद यांचे 2011 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या भोजपुरी इंडस्ट्रीमधील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. सध्या त्यांचा मुलगा विनय आनंद देखील भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करत आहे. तसेच गोविंदाची दुसरी बहीण पद्मा शर्मा म्हणजे आरती सिंहची आई यांचे देखील कर्करोगाने निधन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी गोविंदाचे भाऊजी व आरतीचे वडील आत्माप्रकाश यांचेदेखील कर्करोगाने निधन झाले.
तसेच गोविंदाची तिसरी बहिण कामिनी खन्ना म्हणजे अभिनेत्री रघिणी खन्नाची आई व वडील प्रवीण खन्ना. प्रवीण खन्ना म्हणजेच गोविंदाचे भाओजी यांचा 2015 साली कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यानंतर गोविंदाची बहीण जेव्हा जेवण बनवत होती तेव्हा गॅसचा स्फोट झाला आणि त्या 70% भाजल्या. उपचार केल्यानंतर त्या बऱ्या झाल्या. गोविंदाला कीर्ती किमात नावाचा भाऊ देखील आहे. तेदेखील अभिनेते व निर्माते आहेत.
गोविंदा हा खूपच कमी वेळा आपल्या कुटुंबासमवेत दिसून येत येतो.