महाराष्ट्र

शरद पवार यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि निषेधार्ह..


परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही शरद पवार यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि निषेधार्ह असल्याची तोफ डागली आहे



मंत्री गडकरी यांनी सोशल मिडिया एक्सवर म्हटले की शरद पवार यांनी केलेल्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सातत्याने सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केलेला तीव्र निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठीच्या आपल्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षेला राजकीय विचारांनी कधीही बाधा आणता कामा नये हे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे, असा खोचक सल्ला देताना गटकरी यांनी म्हटले, की राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या राष्ट्रहिताचे रक्षण करताना एकता आणि सहमती असली पाहिजे. परिस्थितीच्या गंभीरतेमुळे राजकीय संबंध किंवा वैयक्तिक मतांची पर्वा न करता दहशतवादाविरुद्ध एकसंध राहणे आवश्यक आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button