क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

26/11 सारख्या हल्ल्याची धमकी,गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली


26/11 सारख्या हल्ल्याच्या धमकीने मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोलच्या (Mumbai Police Traffic Control) व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर (Whatsapp) 10 मोबाइल क्रमांक पाठवले होते, त्यापैकी चार मोबाइल क्रमांकांनी गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली आहे
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले, हे चार क्रमांक यावर्षी फेब्रुवारीपासून बंद असल्यामुळे चिंतेचे कारण बनले आहे.



यूपीतील 4 नंबर, एक नंबर वसईचा

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (ATS) च्या मदतीने यूपीतील बिजनौरचे 5 पैकी 4 नंबर तसेच एक नंबर वसईचा असल्याचे समजले आहे. वसईत ज्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली तो हेअर कटिंग करतो, त्याची चार दिवस चौकशी करण्यात आली. बाकी लोकांची उत्तर प्रदेशात चौकशी करण्यात आली. दरम्यान, आता क्राईम ब्रँचचे एक पथक हरियाणाला चौकशीसाठी गेले आहे, जेणेकरून ज्याचा नंबर व्हॉट्सअ‍ॅपवर आला त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येईल

आयपी अ‍ॅड्रेस यूकेच्या इंटरनेट प्रोव्हायडर कंपनीचा

एजन्सींची झोप उडवणाऱ्या चार मोबाइल क्रमांकांपैकी फेब्रुवारीमध्ये एक, जुलैमध्ये दोन आणि ऑगस्टमध्ये एक मोबाईल क्रमांक बंद करण्यात आला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही त्या मोबाइल नंबरचा सीडीआर काढला आहे. जेणेकरून त्या मोबाइल नंबरच्या युजरचा शोध घेता येईल आणि त्यांची चौकशी केली जाईल.सूत्रांनी सांगितले की, क्राइम ब्रँचला त्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरचा आयपी अ‍ॅड्रेस आतापर्यंत काढता आलेला नाही, फक्त इतकी माहिती मिळालीय की, हा आयपी अ‍ॅड्रेस यूकेच्या इंटरनेट प्रोव्हायडर कंपनीचा असल्याचे समोर आले आहे.

लोकेशन ट्रेस करण्यात अडचण

सूत्रांनी असेही सांगितले की गुन्हे शाखेला संशय आहे की, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करणाऱ्याने व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरला असावा जेणेकरून त्याचे लोकेशन ट्रेस होऊ शकत नाही. तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याने या प्रकरणातील टेरर अ‍ॅंगलही नाकारले नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागे कतारमधील अनिसचा हात?
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेजचा तपास करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहे. धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचे नाव अनिस असून तो दोहा येथील असल्याची संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. या व्यक्तीवर या अगोदर देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासाबाबत मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असल्याने या प्रकरणातील तपासाविषयी माहिती त्यांना देण्यात येत आहे. या संदर्भात मुंबई क्राईम ब्रान्चने व्हॉट्सअपकडेदेखील मेसेजचा रिअल आयपी अॅड्रेस देण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे हा मेसेज कोणत्या देशात बसून केला आहे या विषयी माहिती मिळण्यास मदत होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button