क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

चारित्र्यावर संशय घेत बायकोची ड्रममध्ये बुडवून हत्या


मालेगाव : मालेगावमध्ये घडलेल्या घटनेत नवर्‍याने बायकोला ड्रममध्ये बुडवून मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालेगावातील रमजान पुरा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

अदनान खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून, मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील द्याने शिवारातील फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ राहणार्‍या अब्दुल रेहमान याने बायकोवर संशय घेत तिला जीवे मारल्याची घटना घडली आहे. या दाम्पत्यात सातत्याने भांडणे व्हायची. संशयित अब्दुल हा सतत पत्नीला मारहाण करायचा. तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी भांडायचा.
संशयित अब्दुल खानने पत्नीला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्याने तिला पाण्याच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये बुडवून ठेवले यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button