असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास,२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे …
डायन, चेटकीण, चुडेल असे शब्द आपल्याला काही रहस्यमय कथा तसेच दंत कथा मध्ये वाचायला मिळतात, आणि त्यातूनच आपण कधी न पाहिलेली अशी आपल्या कल्पनेत ती डोळ्यासमोर येते.
अस्ताव्यस्त केस, भीतीदायक डोळे राकट भेसुर चेहरा आणि आक्राळ विक्राळ शरीरयष्टी असं तिचं वर्णन. पण, असं काही नसतं बरं का? ही फक्त आपली कल्पना आहे.
पण, आजही समाजातील काही लोक मानायला तयार नाहीत. या अशा अंधश्रध्देमुळे कित्येंकाचे बळीही गेलेल आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा या गोष्टी व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून असतात. अंधश्रध्दा संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कायदेही केले जात आहेत. पण, अंधश्रध्देच्या घटना कमी होण्याच नाव घेत नाहीत
असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या दुर्गम भागातून समोर आलाय. अक्कलकुवा तालुक्यातील चापडापाडा गावात एका महिलेला मारहाण करत स्मशानभूमीत घेऊन जात त्या ठिकाणची राख खाऊ घातल्याचा प्रकार समोर आलाय. ज्यावेळी पोलिसांनी या सगळ्या संदर्भात तपास सुरू केला, तेव्हा ती महिला डाकीण असल्याच्या संशयातून हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं. बरं हे नंदुरबार जिल्ह्यात घडतय असंही नाही मागच्या १० वर्षात, डाकीण या संशयातून अनेकांचा बळी गेला आहे. ही डाकीण प्रथा काय आहे? या प्रथेची शिकार महिला कशा होतात? या घटना आत्तापर्यंत कुठे कुठे घडल्या आहेत जाणून घेऊयात.
सुरवातीला पाहू डाकीण म्हणजे काय?
तर एखाद्या महिलेच्या अंगात भुत किंवा दैवी शक्ती प्राप्त होते, तेव्हा तीला डाकीण किंवा चेटकीन असं बोललं जातं. मोठ मोठे लाल डोळे, अस्तावेत केस, चेहरा आणि शररीराला आकार नसलेली, घोघरा आणि मोठा आवाज असलेली, आणि आपलं रूप कधीही बदलणारी अशी डाकीणच्या बाबतीत आपली कल्पना आहे. तसेच सिनेमा, नाटक, कथा यामध्ये असं दाखवल्यामुळे आपली बनलेली ही कल्पना. पण, ही डाकीण म्हणून गावातील अनेक महिलांचा बळी घेतला जातोय. आता या डाकीणीला संपवण्यासाठी डाकीण प्रथाही गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू आहे.
आता पाहूयात ही डाकीण प्रथा काय आहे?
एखाद्याच्या घरात वाईट घटना घडल्या, मुलं अजारी पडले, कींवा गावात एखादी मोठी चुकीची घटना घडली तर, गावातील एखाद्या विशीष्ट महिलेला किंवा पुरूषाला जबाबदार ठरवलं जातं. पुरूषांपैक्षा महिलांसोबत असे प्रकार अनेकदा घडतात. कुठलीही वाईट घटना घडली तर त्या महिलेनेच जादूटोणा करून ती घडवून आणली असं ठरवलं जात. मग त्या महिलेला डाकीण म्हणून हिणवलं जातं. तिची छेड काढली जाते. आख्खा गावाकडून तिच्यावर बहिष्कार टाकला जातो. त्यानंतर तिच्यातील भुतप्रेत काढण्यासाठी त्या महिलेला एखाद्या मांत्रीकाकडे नेलं जातं आणि तो मांत्रीक जो म्हणेल तसं त्या महिलेला करावं लागतं. मग कधी तिला आगीवरून चालवलं जातं तर कधी स्मशानातला राख खाऊ घातली जाते. तर कधी तिची हत्या केली जाते. अशा एक ना अनेक घटना समोर आलेल्या आहेत. या प्रकारामुळे अनेकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत, तरीही या घटना काही कमी झाल्या नाहीत
बरं या डाकीण प्रथेची सुरवात कधी आणि कोठून झाली?
आज पासुन पाचशे वर्षापूर्वी म्हणजेच १५ व्या शतकात या प्रथेची सुरवात महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ या गावातून झाली अशी माहिती आहे. या गावातील महिला जादुटोना करण्यासाठी काही पुजा आणि विधी करायच्या असं म्हणलं जातं. विशेष म्हणजे सुरवातीच्या काळात या महिला फक्त सध्याकाळी जादूटोणा करायच्या त्यानंतर त्यांचा प्रभाव एवढा वाढला की त्या दिवसाच्या प्रकाशातही जादुटोण्याचा प्रयोग करू लागल्या. महाराष्ट्रापेक्षाही राजस्थानात हा डाकीण प्रकार अधिक प्रणाणात आहे.
आत्तापर्यंतच्या आकड्यानुसार देशभरात डाकीण म्हणून २५०० पेक्षाही अधिक लोकांची हत्या करण्यात आली आहे.
ज्यामध्ये महिलांच प्रमाण अधिक प्रमाणात आहे
आदिवासी समाजात कोणतीही दुःखद घटना घडली की त्यामागे डाकणचा हात आहे असे गृहित धरले जात. आदिवासी जमतीमध्ये तिला चेटकी, चेटकीण, भुताळी, भुताळीण, जखीण, डायन, हडळ, डाकण व डाकीण अस म्हण्टलं जातं. नाव अनेक पण प्रत्येक भातात तिचं रुप वेगळे, प्रथा वेगळी परंपरा वेगळी महाराष्ट्रत अमरावती, धुळे, नाशिक, नंदुरबार, ठाणे, चंद्रपुर, गोंदिया, व गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यामध्ये डाकीणची घटना फार मोठ्या प्रामाणात समोर येतात. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये, पाड्यांमध्ये डाकीण प्रथा हा संवेदनशील विषय आहे. नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तळोदा व धडगाव तालुक्यात या समस्येने गंभीर रुप धारण केलेले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागाच्या मोलगी पोलीस ठाण्यात डाकीण विषयक गुन्ह्यांच्या जास्त प्रमाणात नोंदी झालेल्या आढळतात. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सातपुड्यात व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये डाकीण, डाकणा प्रथा पूर्वापार असल्याची माहिती आहे. नंदुरबार तालुक्यातील एका गावाचे नावसुध्दा या घटनांवरुन डाकीण पाडा पडलेले आहे. महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये जादुटोणाविरोधी कायदा आणल्या पासुन डाकीण संदर्भातले १६ गुन्हे दाखल झाले आहेत. या अशा घटना घडतात पण या संदर्भात पोलिसांना माहीती मिळत नसल्याने गुन्ह्यांची नोंद कमी होते.
विशेष म्हणजे हे प्रकार आदिवासी भाग असलेल्या नंदुरबारमध्ये अशा घटना खुप भयानक पध्दतीने घडलेल्या आहेत.
२०११ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील माकलीउमर गावात दररोज सकाळी ८.३० वाजता जादुटोणा करते व डाकीण आहे म्हणून कुटुंबीय व गावकऱ्यांनी जेहराबाई कालुसिंग पटेल व तिचा मुलगा राकेश यांना विष पाजून ठार मारलं. ६ मे २००३ रोजी धडगाव तालुक्यातील मांडवी येथील केलीबाई पटले नावाच्या ६० वर्षाच्या वृध्द महिलेला डाकीण ठरवून दगडांनी ठेचुन ठार मारण्यात आलं. या आणि अशा कीती तरी हृदयद्रावक घटना जिल्ह्यात घडतात. तर अनेक घटना जातपंचायतीसमोर मिटविल्या जातात. पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत.
डाकीणच्या प्रथेविषयी व त्यावर डॉक्युमेंट्री करण्यासाठी गेल्या वर्षी जर्मणीहून दोन व्यक्ती भारतात आले होते. तसेच डाकीण विषयी लढा देणाऱ्या झारखंडच्या छूटनी देवी आणि आसामच्या बिरूबाला राभा यांना पद्मश्री पुरस्कारही देण्यात आलेला आहे.
डाकीणच्या प्रथे विषयी जनजागृती तसेच जादूटोणा विरूधी कायदाही करण्यात आलेला आहे. पण, तरीही या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीत ही चिंतेची बाब आहे.