जे आमदार मराठा आरक्षणाचं समर्थन करणार नाहीत.’ काय म्हणाले मनोज जरांगे?
मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र, उद्याच्या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसतं आहे.
दुसरीकडे मनोज जरांगे हे कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेबाबत आग्रही आहेत. जरांगे यांचे उपोषण सुरुच आहे.
मराठा आरक्षणाबाबत तब्बल साडे चार लाख हरकती
सामाजिक न्याय विभागाकडे मराठा आरक्षणाबाबत तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सूरू आहे. लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे उद्याच्या अधिवेशनात हरकतींवर चर्चा होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
मनोज जरांगे आक्रमक
विशेष अधिवेशनात सगे सोयरे हा विषय पहिल्या सत्रातच घ्यावा. आमदार मंत्र्यांनीही तशी मागणी करावी अशी सूचना जरांगे पाटील यांनी केली आहे. जो आमदार आणि मंत्री उद्या 50 टक्क्याच्या आत आरक्षण मागणार नाही त्याला मराठा द्वेषी समजलं जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. जो उद्या मराठा समाजच्याबाजूने बोलणार नाही त्याला मराठा विरोधी समजण्यात येईल असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. आमच्या व्याख्येसह सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
विशेष अधिवेशनात सगे-सोयरे कायदा करावाच लागेल अन्यथा… मनोज जरांगे यांचा इशारा
राज्य सरकारला विशेष अधिवेशनात सगे-सोयरे कायदा करावाच लागेल अन्यथा 21 तारखेला पुन्हा मराठा आंदोलन सुरु होईल असा इशारा जरांगे-पाटलांनी दिलाय..मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस आहे.