हिंगोली मराठा आंदोलकांनी महामंडळाची बस पेटवली
हिंगोली : मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले जात आहे. या दरम्यान हिंगोलीच्या (Hingoli) वसमतमध्ये सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान महामंडळाची बस (St Bus) पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यानंतर अग्निशमन दलाने आग विझविली. यात बसचे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) राज्यभरात आंदोलन सुरु आहे. हिंगोलीत देखील मराठा आंदोलक आक्रमक झाले असून हिंगोली ते नांदेड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान खांडेगाव पाटीजवळ अज्ञात आंदोलकांनी ही बस पेटवली असून यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या मदतीने पेटवण्यात आलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात बसचे मोठे नुकसान झाले आहे.