क्राईम

बेछूट गोळीबार, विद्यार्थ्यांची जीव वाचवण्यासाठी धडपड, १५ जणांचा मृत्यू, ३० जण जखमी


चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री बेछूट गोळीबारात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी असून त्यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेत हल्लेखोरही ठार झाल्याची माहिती आहे.

सरकारी यंत्रणांकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फुटेजमध्ये विद्यार्थी गोळीबारातून पळताना दिसत आहेत. हल्लेखोर नेमका कोण होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हल्लेखोराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. मात्र रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

गोळीबाराच्या घटनेदरम्यान काही विद्यार्थांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतलं. तर काही विद्यार्थी इमारतीच्या गॅलरीमध्ये लपले होते. यावळे खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृ्त्यू झाला आहे. चार्ल्स विद्यापीठाच्या फिलॉसॉफी कॅम्पसमध्ये ही घटना घडली. पर्यटकही येथे वारंवार येत असतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार कॉलेजचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर विद्यार्थी नाताळच्या सुट्टीत जाणार होते. गोळीबार करणारा हा एकटा नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यासोबत आणखी काही जणही असू शकतात.

विद्यार्थ्यांमधील परस्पर वैर हे या घटनचे कारण असू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. डिसेंबर 2019 मध्येही येथे गोळीबार झाला होता. एका 42 वर्षीय व्यक्तीने 6 जणांची हत्या केली होती.

“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांचा मोदींना इशारा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button