आतंकवाद हा कँसर पेक्षा जास्त धोकादायक आहे – धीरेंद्र शास्त्री
आपल्या विधानाने सतत वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आतंकवाद या विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. आतंकवाद हा कँसर पेक्षा जास्त धोकादायक आहे.
त्याला तातडीने प्रतिबंधित केले नाही तर तो संपूर्ण देशाला उध्वस्त करेल त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.परभणी येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेचे आयोजन शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव यांनी केले आहे.
राष्ट्रीय तपास संस्था व दहशतवाद विरोधी पथकाने मुंबई जवळील एका गावात आयएसआयएस या आतंकवादी संघटनेचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसेच या गावात सिरीया मॉडेल स्थापन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, आतंकवाद, धर्मांतर यांच्यावर शासनाने तातडीने निर्बंध आणले पाहिजे. हिंदू धर्मातील युवा जागृत होत असल्यामुळे लव्ह जिहाद सारखे प्रकार कमी होत आहेत. लवकरच ते शून्यावर येतील.