पिंपरी चिंचवड महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये सुरू होणाऱ्या राज्य शासनाचे दर आकारणी धोरण रद्द करा – भारतीय राष्ट्रवादी पार्टी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये सुरू होणाऱ्या राज्य शासनाचे दर आकारणी धोरण रद्द करा अन्यथा जन आंदोलन करू:- भारतीय राष्ट्रवादी पार्टी
चिंचवड महापालिकेची रुग्णालये 8 व दवाखान्यात 29 आतापर्यंत अत्यल्प दरात औषधोपचार मिळत होते. काही घटकांना,तर ते मोफतच होते. मात्र,आता तेथील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता
शासन दराप्रमाणे आकारणी करण्याचे पिंपरी पालिकेने ठरवले आहे.त्यामुळे त्यासाठी आतापेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने पिंपरी चिंचवड मधील सामान्य घटकांना वर अन्याय होणार आहे.यासाठी भारतीय राष्ट्रवादी तर्फे या धोरणाचा आम्ही
निषेध करतो आणि आपण हे धोरण यांची अंमलबजावणी या आठवड्यात करणार आहे, पिंपरी-चिंचवडकरांच्या कररुपी पैशातून ही आरोग्य सेवा उभी राहिली असून त्यात राज्य सरकारचा कसलाही सहभाग नाही. त्यामुळे तेथे सरकारच्या धोरणानुसार शुल्क आकारणी लागू होऊ शकत नाही व आपणस वाटत असेल हे सगळे
महापालिका हॉस्पिटल नुकसान मध्ये आहेत तर या हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार होत आहे का हे तपासावे? महापालिका रुग्णाालयात राज्य शासनाच्या दर आकारणी धोरण रद्द करा,अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टी रस्त्यावर उतरून जनआंदोलन केले जाईल असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे मा.संपर्क प्रमुख महा,राज्य श्री अजित संचेती यांनी दिले आहे.