रस्ते, घरांची छतं, गल्ली, चौकात पडला माशांचा पाऊस,मासे गोळा करण्यासाठी गर्दी
कसा पडतो माश्यांचा पाऊस?
वास्तविक हा असा पाऊस पडण्यामागे एक भौगोलिक कारण आहे. अनेक ठिकाणी चक्रिवादळं येण्याचे प्रमाण जास्त असते. चक्रीवादळं समुद्रातून जमिनीच्या दिशेने येतात. त्यामुळे समुद्राच्या वरच्या भागात पोहोणारे मासे, खेकडे, बेडूक आणि तत्सम अन्य प्राणी या चक्रिवादळात सापडतात. जेव्हा हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने येते, तेव्हा त्याची क्षमता कमी होते आणि पावसाच्या रुपाने चक्रिवादळात सापडलेले जीव जमिनीवर पडतात.
मांसाहारी लोकांना मासे पकडायला आणि खायलाही आवडते. पण जर पृथ्वीवर पाण्याऐवजी माशांचा पाऊस पडला तर? वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु अशीच एक घटना तेलंगणामध्ये घडली आहे.
रस्ते, घरांची छतं, गल्ली, चौकात पडलेल्या माशांचा पाऊस पाहून लोकांनी अक्षरश: हाताला लागेल ते भांडे घेऊन बाहेर धाव घेतली आणि मासे गोळी करण्यासाठी गर्दी केली. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तेलंगणातील जगतियल जिल्ह्यातील (Jagtial) साई नगर भागामध्ये ही आश्चर्यचकित करणारी घटना घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय. अशातच आता माशांचा पाऊस पडल्याने खवय्यांची चंगळ झाली असून मासे गोळा करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, ही एक नैसर्गिक घटना आहे. जोरदार पावसावेळ समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रिवादळामध्ये अडकून छोटे मासे आणि बेडूक आकाशामध्ये उडू लागतात. चक्रिवादळाचा जोर ओसरला की जमिनीवर पडतात.
गेल्या वर्षी अमेरिकेतील टेक्सासच्या टेक्सारकाना शहरामध्येही अशीच घटना घडली होती. येथेही माशांचा पाऊस पडला होता. सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू होती.