भारतीय धम्म महासंघ, बीड भारतीय संविधान दिनानिमित्त परिसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न.
भारतीय धम्म महासंघ, बीड द्वारा 28 वा रविवार. भारतीय संविधान दिनानिमित्त परिसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न.
बीड : भारतीय धम्म महासंघ बीड द्वारा 28 वा रविवार दिनांक 26/11/2023 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन भगवान विद्यालय धानोरा रोड बीड येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. सदरील कार्यक्रमात सामुहिक बुद्ध वंदना, 22 प्रतिज्ञा आणि संविधान उद्देशिका वाचन कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी परिसंवाद प्रमुख व्याख्याता आयु दिपक साठे, लातूर, भारतीय धम्म महासंघ महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ ए ए मजमुले, बीड, बी डी थोरात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महावीर वैरागे, बीसेफ संघटक व एस एम जोगदंड यांनी अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून महामानव यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून पूजन केले. *भारतीय संविधान आणि बौद्ध धम्म एक आदर्श जीवन पध्दती* या परिसंवादातील विषयावर आयु दिपक साठे यांनी मौलिक विचार मांडले. भारतीय संविधान आणि बौद्ध धम्मामुळे सामान्य माणसांचे जीवनात किती अमुलाग्र बदल झाला व होत आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. तसेच भारतीय संविधानामुळे राजकीय समता प्रस्थापित झाली मात्र सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणेसाठी आपणास विधायक संघर्षासिवाय पर्याय नाही.” परिसंवादापुर्वी बुद्ध वंदना कार्यक्रम घेतलेल्या कुटुंबांचा संविधान उद्देशिका, 22 प्रतिज्ञा व गुलाबपुष्प प्रमुख पाहुणे यांचे हस्ते देवुन सन्मान केला. तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ ए ए मजमुले यांनी समयोचीत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, 22 प्रतिज्ञा व संविधान उद्देशिका वाचन अडव्होकेट चंद्रवदन जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक एस एम जोगदंड यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवर यांचे आभार अडव्होकेट सतीश शिंदे यांनी व्यक्त केले. सामुहिक शरणायत्त होवून कार्यक्रमाची सांगता झाली.
परिसंवादाचे यशस्वीतेसाठी आयु सतीष कापसे साहेब, आयु अडव्होकेट सतीश शिंदे, बी एम जोगदंड, दत्ता कसबे सर, जे टी साळवे, डी व्ही मजमुले, भास्कर कांबळे, विलास वाघमारे, बी आर गायकवाड, सुनील जाधव, डी एस आठवले, राजेंद्र गालफाडे सर, संभाजी शिंदे, निळूभाऊ सावरगेकर, जी बी लोणके, सुनील वाघमारे, आदिनाथ सोनवणे, नागनाथ गालफाडे, बाबुलाल पवार, अडागळे सर, साळवे एस एन, सतीष कापसे, आदित्य नवनाथ गालफाडे, एच बी आडागळे, सुधाकर जाधव, डी डी आरे, सुर्यभान पाटोळे वडवणी, कानडे दिपक, अरविंद डोळस, कमलाकर दुनघव व त्यांच्या ब्यांड पथकातील सदस्य यांनी सहभाग नोंदवला. प्रस्तुत कार्यक्रमात सामुहिक शरणायत्त होवून कार्यक्रमाची सांगता झाली.