बीड सह महाराष्ट्रात पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याने बुधवारी महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी हवामानशास्त्रीय (Nocast) चेतावणी जारी केली आहे. तर पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे काढलेल्या अंदाजाला ‘नॉकास्ट’ म्हणतात. IMD ने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड आणि नाशिक जिल्ह्यांसाठीही असाच इशारा दिला आहे.
IMD च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, “पुढील तीन ते चार तासांत ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.”
गुरुवारपर्यंत राज्यात आणि पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. “राज्यात आज आणि उद्या मान्सून जोरदार राहील,” असे या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये संततधार पावसामुळे विविध धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
धबधबे आणि इतर पाण्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर हवामान विभागाकडून नागरिकांना गरज असल्यासच बाहेर पडण्यास सांगितले आहे.