ताज्या बातम्या
ओबीसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल – गोपीचंद पडळकर
जालना : मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता. ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असे उद्गार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले.
जालन्यातील अंबड येथे आज ओबीसी आरक्षणासाठी एल्गार सुरु आहे. सभास्थळी ओबीसींची मोठी गर्दी झालीय. या सभेत ते बोलत होते.
पडळकर म्हणाले, वाघाचे बछडे आज एकत्र आलेत. मराठा आरक्षण सरकारने वेगळं द्यावं. मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ३४६ जातींचा समावेश असलेल्या आरक्षणाला धक्का लागायला नको. यावेळी त्यांनी छगन भुजबळांचे अभिनंदनही केले.