बीडराजकीय

बीडमध्ये भाजप आमदाराच्या पत्नीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..


बीड : बीडमध्ये एका भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदाराच्या पत्नीसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आमदाराच्या पत्नीकडून आदिवासी पारधी शेतकरी कुटुंबाला धमकविल्याचा आरोप करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झालाय. सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय. आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील आदिवासी पारधी शेतकरी कुटुंबाला धमकाविल्याच्या आरोपावरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीचा गुन्ह्यात समवेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आष्टी पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणवार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलीय. हा गुन्हा खोटा असून राजकीय दबावापोटी दाखल झाला आहे. याप्रकरणी वेळ आल्यावर मी माध्यमांना बोलणार आहे, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button