मुंबईतील दक्षिण मुंबई, दादर, घाटकोपर, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस
मुंबई : महाराष्ट्रात मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत दुपारनंतर पावसाला सुरुवात झालीय. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडीनं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
तर, रायगड जिल्ह्यात सावित्री नदी देखील इशारा पातळीवरुन वाहत आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, दादर, घाटकोपर, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईच्या लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय. सीएसएमटी-ठाणे सेक्शन मध्ये खूप पाऊस पडत आहे. मेनलाइन वर काही ट्रेन्स 10-15 मी. व हार्बरवर काही ट्रेन्स 10 मी. विलंबाने धावत आहेत.मात्र, ट्रेन्स कुठेही थांबलेल्या नाहीत.ट्रान्स हार्बर व नेरूळ/बेलापूर खारकोपर मार्गावर ट्रेन्स सुरळीत सुरु आहेत.