ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात
मुंबई: महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाला. मुंबई महापालिकेजवळ झालेल्या या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाले, पण सुदैवाने यात कोणालाही हानी झाली नाही. मुख्यमंत्रीदेखील सुरक्षित आहेत.
स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे जात होते. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागू जोरदार धडक दिली. पुढची कार अचानक थांबल्याने मागची कार आदळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.