पावसाच्या विश्रांतीचा सोयाबीनला अधिक फटका, १८ ऑगस्टपासून पावसाची शक्यता
नागपूर : पावसाने गेल्या काही दिवसांपासून घेतलेल्या विश्रांतीचा फटका सोयाबीन तसेच इतर पिकांना बसण्याची शक्यता आहे. फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक पावसाअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
मात्र आता सात दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. याचा फटका सोयाबीन पिकाला तसेच अन्य पिकांना बसण्याची शक्यता आहे. सध्या फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन पीक पावसापासून वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्र तसेच देशभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. आता भारतीय हवामान विभागाने १८ ऑगस्ट नंतर महाराष्ट्र राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील काही भागांत संबंधित कालावधीत पावसाची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणपट्ट्यांमध्ये पाऊस पडू शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीचा पाऊस पडेल असे अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने सांगितले.