मनसे पक्ष आता…, रोहित पवारांनी राज ठाकरेंना डिवचलं
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या लोकसभेच्या काळात लोकांचे प्रश्न आणि युवकांच्या प्रश्नांवर ते बोलत होते. प्रखरपणे आपले मत मांडत होते मात्र आता ते भाजपच्या जवळ जाणारी भाषा बोलतात, मनसे पूर्वी सारखी आता राहिली नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.मनसेचे पदाधिकारी अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी नागरिकांना भारतीय चित्रपट सृष्टीत स्थान नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे.पत्रकारांनी रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या लोकसभेच्या काळात लोकांचे प्रश्न आणि युवकांच्या प्रश्नांवर ते बोलत होते प्रखरपणे आपले मत मांडत होते. मात्र, आता ते भाजपच्या जवळ जाणारी भाषा बोलतात, त्यामुळे जास्त खोलात न जाता ते आपली जुनी भाषा किंवा लोकांची भाषा कधी बोलतील याकडे आमचं लक्ष आहे. मनसे पूर्वी सारखी आता राहिली नाही, असं रोहित पवार म्हणाले.(मोठी बातमी! भाजपकडून मनसेलाही युतीमध्ये येण्याची ऑफर?)शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीचा संभ्रम भाजपा पुन्हा पुन्हा निर्माण करीत आहे, अशी टीका देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.आज रोहित पवार यांनी बाभळगाव येथे जात विलासराव देशमुख यांच्या समाधीवर जात विलासरावांना त्यांच्या स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या निमित्ताने त्यांनी विलासरावांसारख्या नेत्यांची गरज सध्याच्या परिस्थितीत जाणवते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.(मी तेव्हाच सांगितलं होतं…; अजितदादा, शरद पवार भेटीचा राज ठाकरेंकडून समाचार)’ठाणे महानगरपालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये झालेली घटना ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे अवस्था स्पष्ट करणारी आहे त्यामुळे राजकीय चर्चा करीत बसण्यापेक्षा सामान्य लोकांच्या प्रश्नांवर सरकारने गंभीर व्हावं, असा टोलाही रोहित पवारांनी सरकारला लगावला.