धाराशिव
शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक

धाराशिव : राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेनेतील (शिंदे गट) दहा व इतर पाच असे पंधरा आमदार नाराज आहेत. हे सर्व जण ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही, हा निर्णय तेच घेतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले.आमदार पवार म्हणाले, शिवसेनेत (शिंदे गट) सर्व काही आलबेल नाही. जवळपास दहा आमदार नाराज आहेत, अशी माझ्याकडे माहिती आहे. त्यांचे दहा व इतर पाच असे पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत.