महत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

“अजितदादांचा वाढदिवस दररोज पाहिजे”


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी रोजगार मेळाव्यांसह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नाशिकमध्ये देखील अशाच प्रकारच्या जोरगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादांचा वाढदिवस दररोज यावा, असं म्हटलं.

भुजबळ म्हणाले की, अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार महोत्सव होतोय. अजित पवार यांचा दररोज वाढदिवस आला पाहिजे. शिवाय 12 डिसेंबरला पवारसाहेबांच्या वाढदिवसाला काही कार्यक्रम घेता येईल का याचा विचार करावा. त्यावेळी आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तसेच शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याही जयंतीला असे कार्यक्रम घेतल्यास मला आनंदच होईल, असंही भुजबळ यांनी म्हटलं.

यावेळी जयंत पाटील यांच्या अमित शहा भेटीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले की, त्यांनीच सांगितलं भेट झाली नाही. मंत्रीमंडळात अजुनही १४ जागा शिल्लक आहेत. त्याचा निर्णय वरती होईल, असंही भुजबळ यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर म्हटलं.

दरम्यान ज्यांना ओबीसीचे काम करायचे, त्यांनी खुशाल करावे. ओबीसींच्या प्रश्नांसाठी जे काम करतील, त्याचा आनंद आहे. तसेच माझा कुणालाही विरोध नाही, असंही भुजबळ यांनी नमूद केलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button