ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

अंबाजोगाई येथे भव्य हिंदु धर्मरक्षण मूक मोर्चा


१. मोर्चातील प्रत्येक हिंदूने डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती, तर मोठमोठे भगवे ध्वज लक्षवेधी ठरले.
२. अनेक मोर्चेकरी स्वत:च्या गायींना मोर्चामध्ये घेऊन सहभागी झाले होते. या माध्यमातून गोमातेचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला.
३. मोर्चाच्या निमित्ताने शहरातील बसस्थानक परिसर, मंडीबाजार, मंगळवारपेठ, गुरुवारपेठ, कुत्तरविहिर आणि शहरातील अनेक ठिकाणी व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेऊन मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.
४. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

बीड : अंबाजोगाई ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदे लागू करण्याच्या मागणीसाठी येथे हिंदु धर्मरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चामध्ये ७ सहस्र हिंदु संघटित झाले होते. येथील कुत्तरविहिर परिसरातील तानाजी मालुसरे चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मध्यवर्ती हनुमान मंदिरात महाआरती करून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोचला. या वेळी मोर्चातील एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले. मोर्चाच्या अखेरीला हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींना धर्मशिक्षण द्या ! – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. युवतींनो, स्वत:चे रक्षण स्वत: करण्यासाठी स्वरक्षणाचे प्रशिक्षण शिकून घ्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button