ताज्या बातम्या

शेतकरी संघटनेचा दणका, मुजोर खनिकर्म अधिकारी बामणेला लातूरचा घाट.


 

शेतकरी संघटनेचा दणका, मुजोर खनिकर्म अधिकारी बामणेला लातूरचा घाट.

माननीय मुख्यमंत्री, खाणीकर्म मंत्री, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांचे कडून शरद जोशी विचारमंंच शेतकरी संघटनेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पुणे जिल्ह्याचे खणीकर्म अधिकारी संजय बामणे यांची लातूर येथे बदली करण्यात आलेली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्याचे अनेक तालुक्यांमध्ये अनेक बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर आणि पुणे जिल्ह्यात बेकायदेशीर उत्खनन करून जिल्ह्यात अनेक ठिकाणी चाळण केलेली असून त्यामुळे पर्यावरण व नागरिकांनाच मोठा धोका उत्पन्न झाल्याची तक्रार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली होती त्यात तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी संजय बामणे व त्यांच्या महसूल विभागातील सहकाऱ्यांनी सदरची प्रकरण दाबून ठेवलेली होती संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व खणी कर्म मंत्री माननीय दादाजी भुसे तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे लेखी तक्रार केलेली होती सदर तक्रारीची गंभीर दखल पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी घेऊन चार जून रोजी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य विठ्ठल पवार राजे यांनी समक्ष भेट घेऊन पुरावे सादर केले असता संजय बामणे यांची 12 जून रोजी तडकीफळ बदली करून त्यांना लातूरचा घाट दाखवण्यात आल्याची माहिती संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
संजय बामणे यांनी संघटनेने केलेल्या तक्रारीच्या नंतर तक्रारीची विचारणा करण्यासाठी गेलेले संघटनेचे पुणे जिल्हा शहराध्यक्ष अनिल भांडवलकर व संघटनेचे प्रतिनिधी महादेव सुंदरलाल काजळे यांच्यासोबत संसदीय भाषा वापरत अपमानित करण्यात आलेले होते सदर बाबत संघटनेचे अध्यक्ष यांनी पुणे जिल्ह्याच्या उपाधिकारी उपजिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेत जा विचारला होता त्याचवेळी त्यांनी पुणे जिल्ह्याचे कलेक्टर यांना देखील जाब विचारला होता, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना असंसदीय भाषा वापरल्याच्या नंतर संघटनेने बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व उपायुक्त यांची समक्ष भेट घेत लातूर प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक यांनाही निवेदन दिलेले होते सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याने पुणे जिल्ह्यामध्ये संघटनेने केलेल्या वेगवेगळ्या 20 ते 22 तक्रारींवर जवळपास शंभर कोटीहून अधिकचा महसूल बामणे यांच्याकडून बुडवण्यात आलेला असून त्याबद्दल संघटनेने लातूर उत्पाद प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली असून ती कायम आहे.
बामणे यांच्या मुजोरगिरीमुळे संघटनेने घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेत बामणे यांची थेट लातूरचा घाट दाखवत राज्य प्रशासनाने तबला केल्या असल्याची माहित संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button